अपघातात तरुणाचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।

झुबेद सुर्वे व फुजैल मोहम्मद शोएब खान हे दोघे मोटरसायकल (एमएच-46-एए-4710) घेऊन अलिबाग येथे जात असताना विसावा हॉटेलच्या समोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडीवरून घसरून पडले. यात फुजेलच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. यावेळी झुबेद सुर्वे हा भरधाव वेगाने मोटरसायकल चालवत घेऊन जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मोटरसायकल भरधाव वेगाने चालवून अपघाताला कारणीभूत झाल्या प्रकरणी झुबेद मोहम्मद सुर्वे यांच्या विरोधात (दि.24) एप्रिल रोजी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version