तलावात बुडून युवकाचा मृत्यू

| उरण | वार्ताहर |

खोपटा गावातील रहिवासी महेंद्र रामकृष्ण पाटील यांचा गावातील तलावात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.

खोपटा गावातील रहिवासी महेंद्र रामकृष्ण पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या घराकडे रविवारी (दि.23) जात असताना त्यांचा तोल जाऊन ते गावातील तलावात पडल्याची दुदैवी घटना घडली. गावकऱ्यांनी तलावात त्यांचा शोध घेतला असता सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडला असून, त्यांच्या मृत्यू बद्दल खोपटा गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version