धारूर येथील युवकांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

। बीड । प्रतिनिधी ।
धारूर येथे युवकांनी शेतकरी कामगार पक्षात मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली धारुर येथील युवा कार्यकर्ते निलेश थिट्टे, सुरज चव्हाण, रेवण नखाते, शिवराम बोबडे,
आकाश मस्के, अनंत घुगे, लहू मस्के, सुशील मस्के, अजय मस्के, विकास काजळे, योगेश अंधारे, सचिन मुंडे, झुबेर शेख, आकाश वैरागे, समाधान मस्के, राजाभाऊ मुंडे यांनी जाहीर प्रवेश केला. या वेळी सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या सुचनेवरुन पक्षाचे संघटन मजबूत करुन प्रभावीपणे शेतकरी प्रश्नावर चळवळ उभी करण्यासाठी तरुणांना पक्षात संधी देणार असल्याचे मत शेकापचे युवा नेते मोहन गुंड यांनी व्यक्त केले. यावेळी भाई अमोल सावंत, ऑड निखिल बचुटे, भाई विलास मुंडे उपस्थित होते.

Exit mobile version