| पनवेल | वार्ताहर |
भरधाव बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 19 वर्षीय तरुण जखमी झाल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. राहुल कनोजिया असे या तरुणाचे नाव असून तो कामोठे, सेक्टर- 6 येथे राहतो. राहुल हा झेप्टो शॉप, कामोठे येथून ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी कळंबोली सेक्टर- 3 ई येथे आला होता. तो फायर ब्रिगेडसमोरील रस्त्याने शिवसेना शाखेकडे सिडको गार्डन समोरील रस्त्याने जात होता. यावेळी एनएमएमटीच्या बसने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात राहुल दुचाकीवरून खाली पडला व त्याच्या डाव्या पायाच्या मांडीला आणि उजव्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यावर पोलिसांनी बसचालक राजेंद्र पांडुरंग सावंत (रा. कामोठे सेक्टर 6) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.