नेरळ विद्या मंदिर शाळेसमोर झेब्रा क्रॉसिंग

| नेरळ | प्रतिनिधी |

कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विद्या मंदिर ही शाळा असून, तेथे सतत अपघात होत असतात. त्यामुळे त्या शाळेच्या पालक शिक्षक संघाने आक्रमक भूमिका घेत गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती, अन्यथा पालक रास्ता रोको आंदोलन करणार होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारले असून, लवकरच त्या ठिकाणी गतिरोधक बसविले जातील, असे आश्‍वासन बांधकाम खात्याने दिले आहे.

नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पालक शिक्षक संघाने गतिरोधक बसवून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. पालक शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांनी कर्जत येथे जावून बांधकाम विभाग उपअभियंता वानखेडे यांची भेट घेतली आणि गतिरोधक बसविले नाहीत तर पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेवून रस्ता रोको करतील असा इशारा दिला. पालक संघाचे उपाध्यक्ष राजू झुगरे यांनी संघातर्फे त्याबद्दल ठोस भूमिका घेतल्याने बांधकाम विभाग देखील नरमले आणि गतिरोधक बसविण्याची आश्‍वासन दिले. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कडून कल्याण कर्जत रस्त्यावर आणि कर्जत कल्याण रस्त्यावर नेरळ विद्या मंदिर शाळेसमोर विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारून दिले आहे. काही दिवसात त्या ठिकाणी दोन्ही बाजूला डांबरी गतिरोधक बसवून दिले जातील, असे आश्‍वासन नेरळ विद्या मंदिर शाळेचे मुख्यध्यापक पी.बी. विचवे यांना दिले आहे.

त्याचवेळी संबंधित ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात झेब्रा क्रॉसिंग बसविले जात असताना पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजू झिगरे उपस्थित होते.

Exit mobile version