। बीजिंग । वृत्तसंस्था ।
कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठून झाला याचा शोध घेण्याची मागणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यादरम्यान चिनी संशोधकांनी वटवाघळांमध्ये एका नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा शोध लावल्याचा दावा केला आहे. सीएनएनने आपल्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या कोरोना विषाणूची प्रजाती ही जेनेटिक दृष्ट्या कोविड-19 विषाणूच्या खूप जवळ जाणारी असू शकते. संशोधकांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम चीनमध्ये कोरोना विषाणूच्या घेण्यात आलेल्या नव्या शोधामुळे वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे कोरोना विषाणू असू शकतात. ते माणसांनाही बाधित करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. उशश्रश्र जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये शान्डोंग विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, वेगवेगळ्या प्रजातीच्या वटवाघळांमधून आम्ही 24 प्रकारचे कोरोना विषाणू एकत्रित केले आहेत.