| ओव्हल | वृत्तसंस्था |
इग्लंड आणि वेस्ट इंडिज संघांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दोन्ही संघांमध्ये तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी ओव्हल येथे खेळवला गेला. परंतु, वाहतुक कोंडीमुळे खेळाडू अडकले. इंग्लंडच्या खेळाडूंनी तर सायकलवरून स्टेडियम गाठले आणि त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. त्यामुळे क्रिकेट इतिहासात असे प्रथमच घडले असावे, अशा चर्चा सुरू आहेत.
ओव्हल येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याची सुरुवात उशिरा झाली. कारण पाहुण्या संघाची बस वाहतुक कोंडीत अडकली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नाणेफेकीपूर्वी एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले आहे की, वाहतुक कोंडीत अडकलेल्या एका संघाच्या उशिरा आगमनामुळे सामना सुरू होण्यास विलंब होईल. संघांचे सर्व सदस्य पोहोचल्यानंतर, सामना अधिकारी वेळेचे समन्वय साधतील आणि खेळाच्या वेळापत्रकावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करतील. सुरुवातीला स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता टॉस होणार होता, तो दुपारी 1:10 वाजता झाला. यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.