| मुंबई |
देशात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे मोठ्या प्रमाणात वाढ आहेत. त्यामुळे अशा प्रकरणाला बळी पडलेल्या लोकांना काय करोवे कुठे तक्रार करावी याची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नॅशनल हेल्पलाईन नंबर 155260 आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत.
एखाद्या व्यक्तीला तक्रार दाखल करायची असल्यास या हेल्पलाईनचा उपयोग करु शकतात. याच्या माध्यमातून लोकांनी मेहनतीने कमावलेला पैसा वाचवण्यास मदत मिळेल. तसेच नागरिकांना डिजिटल सुरक्षा देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात ही हेल्पलाईन आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहेत.
1 एप्रिल 2021 ला हेल्पलाईनला लॉचिंग करण्यात आले होते. हेल्पलाईन 155260 आणि याच्या रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मला गृहमंत्रालयानुसार भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने भारतीय रिझर्व बँक, सर्व मोठ्या बँका, पेमेंट बँका, वॉलेट आणि ऑनलाईन मर्चेंडच्या साहाय्याने चालू केले आहे. सध्या ही हेल्पलाईन छत्तीसगड, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या सात राज्यात आणि इतर केंद्रशासित प्रदेशात वापरण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.