अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता जाहीर होईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. परंतु एक वाजता वेबसाइट सुरु केल्यावर हँग झाली. त्यामुळे अजुनही अनेक विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.