| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील खारआंबोली येथील आंबोली धरण पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी व त्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्थानिक नागरिक व पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रोज अनेक जण कुटुंबासह व मित्रपरिवारासोबत येथे भेट देत आहेत. पर्यटकांकडून छायाचित्रे व सेल्फी काढण्याचीही मोठी क्रेझ दिसून येत आहे. धरणाचा ओव्हरफ्लो पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे परिसरातील छोट्या व्यावसायिकांनाही चांगला व्यवसाय मिळत आहे.







