| उरण | प्रतिनिधी |
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा शनिवारी (दि.27) उरण शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरण शहरातील विमला तलावामध्ये असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी आमदार मनोहर भोईर, नगराध्यक्ष भावना घाणेकर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करून जोरदारपणे जयघोष करण्यात आला. तसेच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये व शिवसेना उरण शहर शाखेमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, चेतन म्हात्रे, मंगेश कासारे, वंदना पवार, प्रार्थना म्हात्रे, प्रमिला पवार, ममता पाटील, विना तलरेजा, माधुरी चव्हाण, लता जाधव, सोनाली जाधव, निरंतर कदम, संतोष पवार, विजय जाधव, फते खान, सागर पाटील, सुशांत तांडेल, संदेश पाटील, इस्माईल शेख, सरपंच सि.के. गायकवाड व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






