। कोलाड । वार्ताहर ।
आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम ठप्प होते. ते काम पुन्हा यंत्रणा लावत सुरू झाले आहे. दुसरीकडे हे काम सुरू असताना त्यामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रणाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपूल व रस्त्याच्या कामात दिवसेंदिवस विलंब होत असल्यामुळे रखडलेल्या कामाबाबत येथील ग्रामस्थ नागरिकांनी उपविभागीय दंडाधिकारी रोहा यांना निवेदन दिले होते. त्यानंतर आता पुन्हा उड्डाणपुलाच्या कामात गती आली असून काम सुरू असताना वाहनचालकांनी वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम ठप्प होते. मात्र त्या कामाला पुन्हा गती येताना दिसून येत आहे. याचा आनंद आहे मात्र हे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित खात्याने तसेच ठेकेदाराने शर्थीचे प्रयत्न करून उडणारी धूळ आणि वाढती वाहतूक कोंडी यावर अधिक उपाय योजना करावी. मार्गावर जड अवजड वाहनांची वाहतूक तसेच त्याला जोडला गेलेला रोहा मार्ग त्यामुळे भर चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यावर ठोस उपाययोजना संबंधित खात्याकडून करण्यात यावी. त्याच बरोबर वाहनचालकांनी देखील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.
डॉ.मंगेश सानप