। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षातर्फे जागतिक महिला दिन काव्यवाचन मैफिली स्वरूपात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. संजना पाटील यांनी ‘कौतुक’ ही कविता सादर केली. प्रा. वृषाली घरत यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी सादर करत ‘नारीशक्तीचा जयजयकार’ ही कविता सादर केली. तसेच, प्रा. पूजा म्हात्रे यांनी ‘राधाकृष्ण’, प्रा. डॉ. रसिका म्हात्रे यांनी ‘निसर्ग’, प्रा. जयश्री ठाकूर यांनी ‘दसरा’, प्रा. डॉ.नम्रता पाटील यांनी महिला जीवनावर आधारित ‘देवा फक्त एकदा इथे बाई म्हणून जन्म घेऊन बघ’ ही कविता सादर केली. त्याचबरोबर ग्रंथालय विभाग प्रमुख कांचन म्हात्रे यांनी देखील महिला जागृती विषयावर कविता सादर केली. त्यानंतर प्रा. दिनेश पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी सर्व स्टाफला महिला दिनाच्या शुभेच्छा देत कवी भालचंद्र कोळपकर यांची ‘शुभेच्छा’ ही कविता सादर केली. याप्रसंगी काव्य सादरीकरण करणार्या प्रत्येक स्टाफला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजना पाटील यांनी केले. तर, कार्यक्रमाचे आभार महिला सक्षमीकरण कक्ष प्रमुख कांचन म्हात्रे यांनी मानले.