| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील खांब-पालदाड अंतर्गत मार्ग डागडुजीच्या कामासाठी 18 व 19 जुलै या दोन दिवसांसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मालसई ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे. पालदाड पूल ते उडदवणे गावाच्या हद्दीपर्यंतचा रस्ता पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने ही दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या कालावधीत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 20 जुलैपासून हा मार्ग पुन्हा वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे.







