। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गॅस सिलेंडर वापरुन त्याचा व्यवसाय करणाऱ्या 4 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. शहरातील पळस्पे फाटा, पळस्पे गाव येथे बेकायदेशीररित्या ताब्यातील गॅस सिलेंडरद्वारे शेगडी पेटवून त्यावर पाणीपुरी विक्री करणारा तसेच चहा बनवून विक्री करणारा, बिर्याणी बनवून विक्री करणारा, मंचुरियन बनवून विक्री करणाऱ्या अशा 4 जणांविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली. तसेच, त्यांच्याकडे वापरात असलेले बेकायदेशीर सिलेंडर ताब्यात घेण्यात आले आहेत.






