| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नीट पेपरफुटीने लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर घाला घातला आणि न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना लाठ्यांनी उत्तर देण्यात आले. ही लोकशाही नव्हे, तर सत्तेची दडपशाही आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे. शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र अन्यायासमोर कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा संघर्ष सुरूच राहील. लाठीच्या जोरावर तरुणाईचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न रस्त्यावरच परतवून लावला जाईल. विद्यार्थ्यांचा लढा हा केवळ परीक्षेचा नाही, तर देशाच्या भवितव्याचा आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा लढा आहे.







