शाकिब अल हसनच्या मानधनातून 10 टक्के कपात

आयसीसीने ठोठावला दंड

। रावळपिंडी । वृत्तसंस्था ।

पाकिस्तान संघाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेश क्रिकेट संघाला एकापाठोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत स्लो ओव्हररेटमुळे पाकिस्तान आणि बांगलादेशचे गुण कमी केले. त्याचवेळी आता आयसीसीने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर मोठी कारवाई केली आहे.

पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी कसोटी दरम्यान आयसीसी आचारसंहितेचा स्तर 1 भंग केल्याबद्दल शकीब अल हसनला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. शाकीबने आचारसंहितेच्या कलम 2.9 चे उल्लंघन केले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, खेळाडूचे सपोर्ट स्टाफ, अंपायर, मॅच रेफरी किंवा इतर कोणत्याही तिसर्‍या व्यक्तीच्याजवळ अयोग्य वर्तन करण्यास मनाई करते. सामन्यादरम्यान शाकिबला राग अनावर झाला त्याने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानकडे चेंडू फेकला होता. याप्रकरणी शाकिबने आपली चूक मान्य केली आहे.

Exit mobile version