रायगड जिल्ह्यात 109 रुग्ण

पाच तालुक्यात नवे रुग्ण नाही
4 जणांचा मृत्यू तर 131 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी नव्याने 109 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 131 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत तर उरण, मुरुड, तळा, रोहा, आणि श्रीवर्धन या पाच तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मंगळवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 42, पनवेल ग्रामीण 9, खालापूर 2, कर्जत 1, पेण 5, अलिबाग 33, माणगाव 9, सुधागड 3, म्हसळा 1, महाड 2 आणि पोलादपूर 2 असे एकूण 109 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर उरण, मुरुड, रोहा, तळा, श्रीवर्धन या पाच तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे तर पनवेल मनपा क्षेत्रात 2, पेण, अलिबाग या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 63 हजार 963 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 58 हजार 336 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 136 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 491 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version