| मुंबई | वार्ताहर |
अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीत 13 हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले असून अद्याप 5 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर येत्या काळात एटिकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाईल.मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील एकूण जवळपास 1 लाख 47 हजार जागा रिक्त होत्या आणि अर्ज केलेल्या जवळपास 45 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे बाकी होते. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या 1 लाख 7 हजार 298 जागांसाठी एकूण 18 हजार 703 विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी 13 हजार 4 विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालय मिळाले. 8 हजार 225 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, 1 हजार 748 विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि 982 विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.