| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील विविध बँकांना विविध राज्यांकडून देण्यात येणाऱ्या शासकीय सुट्ट्या आणि शनिवार-रविवारची आठवडी सुट्टी धरून साधारण 12 दिवस मे महिन्यात सुट्टी असणार आहे. याबाबतची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. तर, काही राज्यांमधील बँका निवडणुकांमुळं बंद राहणार आहेत. विविध महापुरुषांच्या जयंती आणि अक्षय्य तृतीयेसारख्या पर्वांनिमित्तही देशातील बऱ्याच राज्यांमधील बँका बंद राहतील, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इंफाळ, कोची, कोलकाता, पणजी, पाटणा आणि तिरुवअनंतपूरम येथील बँकांना सुट्टी, 5 मे रविवार, 8 मे रविंद्रनाथ टागोर जयंती, कोलकाता येथील बँका बंद, 10 मे – बसव जयंती, अक्षय्य तृतीयानिमित्त बंगळुरू येथील बँका बंद. 11 मे महिन्याचा दुसरा शनिवार, 12 मे रविवार, 16 मे राज्य दिनानिमित्त गंगटोक येथील बँकांना सुट्टी, 19 मे रविवार, 20 मे लोकसभा निवडणूक, मुंबईतील बहुतांश बँकांना सुट्टी, 23 मे बुद्धपौर्णिमेनिमित्त बँका बंद, 25 मे नजरुल जयंतीनिमित्त काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी, 26 मे बँकांना रविवारची आठवडी सुट्टी असणार आहे.