काबूल | वृत्तसंस्था |
काबूल विमानतळावर आतापर्यंत 12 नागरिक ठार झाले आहेत. नाटो आणि तालिबानच्या अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रॉयटर्नसे यासंदर्भात वृत्त दिलं आहे. तालिबानच्या बंडखोराने रॉयटर्सशी बोलताना नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर गेटवर गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे. तसंच उड्डाण करून देशाबाहेर जाण्याचे कायदेशीर हक्क नसतील तर घरी जावं असंही सांगितलं आहे. आम्हाला विमानतळावर कोणालाही इजा पोहोचवायची नाही आहे, असं त्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर म्हटलं आहे.