अलिबाग तालुक्यात 123 नवे रुग्ण; दोन रुग्णांचा मृत्यू

70 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेले काही दिवस अलिबाग तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली घसरल्याने थोडा फार दिलासा मिळत असतानाच आज गुरुवारी दि.29 जून रोजी ही संख्या पुन्हा एकदा शंभरापुढे गेली आहे. आज कोरोनाच्या 123 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 70 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 459 झाली आहे. यापैकी 469 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 14 हजार 734 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 256 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version