176 शिक्षकांना सर्वंकष मूल्यमापनाचे धडे


| खरोशी | वार्ताहर |

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन टप्पा-2 चे प्रशिक्षण 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत पेण तालुकास्तरीय प्रशिक्षण सौ. म.ना. नेने कन्या विद्यालय, पेण येथे तीन गटात सुरू असून, आनंदी वातावरणात गटकार्यात शिक्षक रमलेले चित्र पहावयास मिळाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती पेण यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी अरूणादेवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने सुरू असून, या प्रशिक्षणाचे उत्तम नियोजन व व्यवस्थापन निलेश मानकवळे, पुरूषोत्तम म्हात्रे, हितेंद्र म्हात्रे, करूणा भोईर, हर्षला शेळके, प्रवीण मगर करत आहेत. या प्रशिक्षणात जिल्हा परिषदेचे 147, नगरपालिका 9, खासगी अनुदानित 20 असे 176 शिक्षक पाच दिवसांचे प्रशिक्षण घेत आहेत.

Exit mobile version