तळा 31 तर रोह्यात 24 उमेदवारी अर्ज दाखल

। तळा/ रोहा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायत निवडणूक हि अत्यंत चुरशीची होणार असून 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी आजपर्यंत चांगलीच धावपळ सुरू होती. सोमवारी शिवसेना, शेकाप, वंचित व अपक्ष उमेदवारांकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ज्यामध्ये शिवसेनेकडून 24 उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाकडून 2 उमेदवार, वंचित बहुजन आघाडी कडून 2 उमेदवार तर अपक्ष 3 अशा एकूण 31 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.


रोहा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींमध्ये पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून एकूण 24 अर्ज प्राप्त झाले आहेत.तालुक्यातील नेहरूनगर आणि न्हावे ग्रामपंचायतीमध्ये एकही अर्ज दाखल झालेला नाही. कोकबन, जामगाव, तळाघर, पाटणसई, भिसे या ग्रामपंचायतींमध्ये एका जागेसाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला आहे. तळवली तर्फे अष्टमी येथे एका जागेसाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत. तर नागोठणे ग्रामपंचायत एका जागेसाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. तर पहूर येथे एक जागेसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर शेवटचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version