चणेरा येथे रक्तदान शिबीरात 41 रक्तदात्यांने केला रक्तदान

। चणेरा । वार्ताहर ।
सामाजिक बांधीलकीच्या नात्याने रोहा तालुक्यातील दिपस्तंभशिवशंभो सामजिक संस्थारोहा ह्याच्या तर्फे रायगड जिल्हा रुग्णालयात अलिबाग यांच्या सहकार्याने कुणबी समाज हॉल चणेरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनाचे संकट सर्वत्र भोंभावात आहे. परीणामी अजून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ह्याच बाबी विचारात घेता दिपस्तंभ शिवशंभो सामजिक संस्थेने चणेरा येथे रक्तदान शिबिर राबवले, गणेशोत्सव असून ही रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उस्पूर्त सहभाग दर्शवत 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगीं पंचायत समिती उपसभापती रोहा रामचंद्र सकपाळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलित करण्यात आले.त्यावेळी चणेरा सरपंच प्रसन्न सिनकर, काशिनाथ भोईर, जलिल धनसे, नरेश देवळे आदी उपस्थित होते. दीपस्तंभ सामजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष भोईर, उपाध्यक्ष महादेव मोरे, मयूर विचारे, राजेश घोसाळकर, जनार्दन पाटील, अनिल भोईर, समिर वाडेकर, महेंद्र पाटेकर सदस्यांनी अथक परिश्रम घेते रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. संस्थेने जपलेल्या सामजिक बांधिलकी चे सर्वदूर कैतुक होत आहे.

Exit mobile version