| मुंबई | प्रतिनिधी |
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव समारंभ शानदारपणे पार पडला. याप्रसंगी विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 65 अभियंताचा गौरव सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करुन करण्यात आला. राज्याला शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्याकडे नेवून राज्याच्या विकासात सार्वजनिक बांधकाम विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.त्यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. अपर मुख्य सचिव मनोज सौनिक व विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाची जनमानसात जी प्रतिमा तयार झाली आह ती उंचावण्यासाठी फाईली,पैसे यातून अभियंत्यांनी बाहेर पड़ावे, खात्यामधली खुर्चीची स्पर्धा संपवा,अधिकारी आपल्या मेरिट वर खुर्चीत बसला पाहिजे.
– रविंद्र चव्हाण, सा.बांधकाम मंत्री