निसर्गसुंदर थळ सामाजिक संस्थेचा उपक्रम
| अलिबाग | वार्ताहर |
थळ गावातील होतकरू तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी ‘निसर्गसुंदर थळ सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या पुढाकारातून थळडोंगरी येथे विविध प्रकारच्या शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.थळचे नैसर्गिक सौंदर्य टिकवणे व वाढवणे, स्वच्छता मोहिमा राबवणे, पर्यटनला चालना देणे, गावातील नवतरूणांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देणे असे अनेक उद्देश समोर ठेवून दि. 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता गावातील मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी थळडोंगरी येथे दोन टप्प्यामध्ये 501 झाडे लावून या वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व सभासद आणि गावातील सुमारे 100 नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.







