। कँडी । वृत्तसंस्था ।
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कपच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. आज अ गटात भारताचा नेपाळशी सामना होणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला की, प्रथम गोलंदाजी करण्याचे विशेष कारण नाही. गेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि या सामन्यात त्यांना प्रथम गोलंदाजी करून गोलंदाजांचा सराव करायचा आहे.
नेपाळचा संघ पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना 238 धावांच्या मोठ्या फरकाने हरला आहे. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. पाकिस्तान सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर-4 मध्ये प्रवेश करेल, तर पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल.
दोन्ही संघाची प्लेयिंग 11 भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरे, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.