| बंगळुरू | वृत्तसंस्था |
देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील आदित्य एल 1 उपग्रहाची पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर आता आदित्य -1 उपग्रहाने पहिला सेल्फी इस्रोला पाठवला आहे. पृथ्वीपासून सूर्याच्या 125 दिवसांच्या प्रवासातील हा पहिलाच फोटो अपडेट आहे. आदित्यने पाठवलेल्या सेल्फीमधून पृथ्वी व चंद्राचे फोटो पाहायला मिळत आहेत. ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून हा सुंदर क्षण जगाबरोबर शेअर केला आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार आता आदित्य एल 1 ची कक्षा बदलाचा दुसरा टप्पा 5 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय स्थानिक वेळेनुसार पहाटे तीन वाजता पार पडला. याआधी पहिली पृथ्वी कक्षा परिभ्रमण मोहीम (ईबीएन 1) बंगळुरूच्या आयएसटीआरएसी येथून यशस्वीरित्या पार पडली. होती. शनिवारी 2 सप्टेंबरला आदित्य एल- 1 चे आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते.
पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान 125 दिवसांनी पोहोचणार आहे. हे अंतर पृथ्वी-सूर्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्केच असले तरीही एल-1 हा सूर्याच्या तुलनेने सर्वात जवळचा बिंदू मानला जातो. अवघ्या 400 कोटींच्या बजेटमध्ये सौर मोहीम राबवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
दुसरीकडे भारताची यशस्वी चांद्रयान मोहीम सध्या ब्रेकवर आहे. पुढचे 14 दिवस चंद्रावर गडद अंधार (चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस उजेड असतो) असणार आहे. त्यामुळे इस्रोने विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर आता निष्क्रिय केलेलं आहे.