चित्रा पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण
सुतारवाडी | वार्ताहर |
‘गोविंदा वाजत गाजत आला’ या गीताचा लोकार्पण सोहळा चित्रा पाटील यांच्या हस्ते सोमवार, दि. 30 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. नांगरवाडी येथील रमेश धुमाळ यांचे सुपुत्र राज धुमाळ यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, या गीताचे गायन गायक नंदेश विठ्ठल उमप यांनी केले आहे.
‘गोविंदा वाजत आला’ हे गीत राज धुमाळ युट्युब चॅनेल व नेट पॅक ओटीटी प्लिकेशनद्वारे प्रकाशित होणार आहे. राज धुमाळ या उदोन्मुख संगीत दिग्दर्शकाने अनेक दर्जेदार गीतांना स्वरसाद चढविला आहे. तीन लघुपट, दोन वेबसिरीज त्याचप्रमाणे आगामी कम ऑन सुलतान या मराठी चित्रपटासाठी पार्श्वसंगीत आणि टायटल ट्रॅक केले आहे.
या संगीतमय क्षेत्रात राजचे वडील रमेश धुमाळ बहिण राणी धुमाळ त्याचप्रमाणे नंदकुमार घरत, वैभव महाडिक, मयुरेश पाटील, रोहित भोईर, रोशन भोईर, किशोर पाटील, प्रमोद पाटील आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. ग्रामीण भागातील एक होतकरू तरुण संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे, याचा आनंद मित्र परिवारासह नांगरवाडी ग्रामस्थांना मोठा अभिमान आहे.