| रायगड | प्रतिनिधी |
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वेळी ‘माझ्या मायबोलीचे मराठी साहित्यातील स्थान’ या विषयावर खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली. पहिल्या पाच जणांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. युनिकोड फाँटमध्ये टाईप करून 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 1949. यावर लेख पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती, नियमावली व आगावू नोंदणी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक राजन देसाई 8779983390 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त ॲड. देवदत्त लाड, विकास होशिंग, संजीव गुप्ते यांनी केले आहे.