35 वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा
| अलिबाग | प्रतिनिधी |
माध्यमिक विद्या मंदिर फोफेरी अलिबाग शाळेच्या 1989 च्या दहावीच्या बॅचचे माजी विध्यार्थीनी रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी हाशिवरे येथे एकत्र येऊन गेट टुगेदर मोठ्या उत्साहात साजरा केला. 35 वर्षानंतर एकत्र जमलेल्या माजी विध्यार्थीमध्ये प्रशांत गावंड, रत्नाकर पाटील, विश्वास मोकल, नरेंद्र मोकल, एकनाथ पाटील, विजय गावंड, गणेश म्हात्रे, नितीन मोकल, राजेंद्र म्हात्रे, संदेश गोठणकर, नितीन भगत, विजय म्हात्रे, महेश पाटील, संतोष पाटील, महेंद्र म्हात्रे, भरत पाटील, चंद्रकांत पाटील, धनंजय मोकल, दिलीप पाटील, विनोद पाटील, प्रार्थना नागावकर, अंजली पाटील, वैजयंती पाटील, सुमित व अमित उपस्थित होते. तर इतर काही माजी विद्यार्थीना आपल्या व्यस्त कामामुळे या गेट टुगेदर कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्यांनी दूरध्वनीद्वारे या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या वेळी दहावीच्या बॅचचे शिक्षक अनंत पाटील, राजेंद्र नागवकर, आशा पाटील बाई आवर्जून उपस्थित होते. त्यांनी मागर्दशन करून शुभेच्छा दिल्या. सर्व विध्यार्थीयांनी आपला परिचय देत सध्या काय करतो हे सांगून, इतक्या वर्षातील अनुभव सांगितले व जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला. दुपारच्या स्नेहभोजनानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. यात विजयी स्पर्धकांना शिक्षकांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. या वेळी सर्वांनी एकमेकांना पुढील वाटचालीसाठी, निरोगी व आरोग्यादायी आनंदी जीवनासाठी शुभेच्छा देऊन निरोप घेण्यात आला.