| पाताळगंगा | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे पहिलीच्या वर्गामध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पायांचे व हाताचे ठसे एका कागदावर घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी राबविला. तसेच नवीन प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना सन्मानाने शाळेत आणण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी छोटा भीम, डोनाल्ड, डक, चुटकी यांच्या वेषात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर प्रभात फेरी काढून फुग्यांवर लिहिलेली घोषवाक्ये, पालकांचे लक्ष वेधून घेतले जात होते. यावेळी हा परिसर मुलांच्या घोषवाक्यांनी गर्जून गेल्याचे पाहावयास मिळाले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी मा. सरपंच गौरी गडगे, महादेव गडगे यांच्या माध्यमातून गोड खाऊचे वाटप करुन मुलांचा पहिला दिवस गोड करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करूणा ठोंबरे, सदस्य शिल्पा जाधव, पालक ग्रामस्थ यांच्यासह शिक्षक वैजीनाथ जाधव, सरस्वती कवाद, स्वयंसेविका निकिता गडगे, साक्षी जांभुळकर उपस्थित होत्या.