| पनवेल | वार्ताहर |
मोडक्या शेडमध्ये आठ गोवंशीय बैल आणि गाय यांना क्रूरतापूर्वक वागणूक दिल्या बाबत व कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्या बाबत सलमान हमीद पटेल (36) तळोजा याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा गावामध्ये पनवेल मुंब्रा रोड लगत असलेल्या मशिदीच्या समोरील मोडक्या शेडमध्ये आठ गोवंशीय बैल आणि गाई कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवले असल्याची माहिती वॉलेटियर ध्यान फाउंडेशनचे प्रतीक ननावरे यांना मिळाली. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी जनावरांना चारापाण्याची व्यवस्था न करता रस्सीने क्रूरतापूर्वक चिखलामध्ये बांधून ठेवले होते व काही पशुंच्या नाकामधून रक्त येत होते. या प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.