कॅप्टन उमेश वाणी यांचे आवाहन
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
युवकांनी साहस आणि राष्ट्रप्रेम अशा दोन्हीही गोष्टी साध्य होणारे स्फूर्तिदायी करिअर निवडून सैन्य दलामध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन निवृत्त कॅप्टन उमेश वाणी यांनी युवकांशी संवाद साधताना केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशीक व हिंदू एज्युकेशन सोसायटी मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकार विद्यामंदीर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कॅप्टन उमेश वाणी, हिंदू एज्युकेशन सोसायटी मुरुडचे चेअरमन दिलीप जोशी, कोषाध्यक्ष मनोहर गुरव, विश्वस्त दिलीप दांडेकर, दिपाली जोशी, मुख्याध्यापिका प्रविता गार्डी, अनुप सिंह, सचिव सुनील विरकुड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कॅप्टन वाणी यांनी भूदल आणि नौदलात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत विस्तृत माहिती दिली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिक्षां विषयी माहिती देताना विद्यार्थ्यानी चालु घडामोडींचा वेध घेत सामान्य ज्ञान व शारीरिक तंदुरुस्ती संदर्भात खुपशा प्रेरणादायी बाबी कथन करून विद्यार्थ्यांना प्रेरीत केले.