। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेटपटू रणजी ट्रॉफी स्पर्धेत फ्लॉप ठरत असताना अष्टपैलू रविंद्र जडेजाने मात्र चमकला आहे. सौराष्ट्र संघाकडून खेळताना रविंद्र जडेजाने दिल्लीविरूद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावेळी, जडेजाने दिल्लीविरूद्ध 5 बळी घेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. जडेजाच्या 5 बळींच्या मदतीने सौराष्ट्राने दिल्लीचा डाव 188 धावांवर गुंडाळला. रविंद्र जडेजा देशांतर्गत क्रिकेटपासून दुरावला नसल्याने त्याच्या पदरी हे यश पडले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील अंतीम सामना 2023 च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत तमिळनाडूविरूद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने अवघ्या 48 धावा देत 7 बळी मिळवले होते. जडेजा देशांतर्गत क्रिकेटशी जोडलेला राहिल्याने तो आपल्याला चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे.