| पनवेल | वार्ताहर |
अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या सोसायटीच्या परिसरातून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव तिचे फुस लावून अपनयन केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अंकिताकुमारी पारसकुमार राय (13), रा.तक्का गाव उंची 5 फुट, बांधा सडपातळ, रंग गोरा, डोक्याचे केस काळे व बॉबकट, डोळे काळे, अंगात काळ्या रंगाचा स्कर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट तसेच पायात निळ्या रंगाचे बुट आहेत. डाव्या हाताच्या मनगटावर कापल्याच्या जुन्या खुणा असून तिला मराठी, हिंदी, भोजपूरी, बिहारी भाषा अवगत आहे. सोबत मोबाईल फोन आहे. ह्या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र.9511779864 किंवा पो.उपनिरीक्षक उद्धव सोळंके यांच्याशी संपर्क साधावा.






