| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील सुपेगाव परिसरातील सुमारे 54 किमी क्षेत्रफळ असलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्य मध्ये आज (बौद्ध पौर्णिमा) पासून पक्षी व वन्यप्राण्यांची गणना सुरू होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गणना मोहीम राबविण्यात येणार असून, वन अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. या अभयारण्यात बिबट्या, सांबर, डुक्कर, ससा, काळा मांजर, रानमांजर, सालिंदर, वानर, मोर, गवा यांसारखे सुमारे 19 प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. तसेच सुमारे 190 प्रकारचे पक्षी आणि 130 प्रकारची फुलपाखरे येथे आढळतात. या गणनेतून अभयारण्यात पक्षी-प्राण्यांची संख्या वाढली आहे की घटली, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.







