। उरण । वार्ताहर ।
मा. सभापती पंचायत समिती उरण अॅड. सागर सदानंद कडू यांच्या माध्यमातून चाणजे ग्रामपंचायत हद्दीत डाऊर नगर येथे अंगणवाडी मंजूर करण्यात आली आहे. सदर अंगणवाडीचे भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. सदर भुमीपूजन कार्यक्रम प्रसंगी शेकाप तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते काका पाटील, सीमा घरत, महादेव बंडा, मोरेश्वर भोईर, कैलास भोईर, किंजल भोईर, जितू ठाकूर, शिवसेना उप जिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, नैना पाटील, नयन म्हात्रे, सचिन कडू, समीर कडू, संतोष पाटील, मनीष कातकरी,आदी उपस्थित होते.