| चिरनेर | प्रतिनिधी |
यशस्वी जीवन प्रवास घडविणाऱ्या शंकर माळी यांचा समाजात विशेष सहभाग आहे. त्यांच्या समाजभिमुख विचारांमुळे त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा कर्तुत्वान प्रवास कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठीही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जेएनपीएचे माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी केले. जेएनपीएचे कामगार शंकरमाळी हे 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने चिर्ले येथील मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे त्यांचा सेवापुर्तीचा सत्कार सोहळा रविवारी (दि.31) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भूषण पाटील हे अध्यक्षीय भाषणात बोलत होते. व्यासपीठावर इतिहासचार्य के.एम. मढवी, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, माजी मुख्याध्यापक जांभळे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पाटील, रामचंद्र म्हात्रे, अरुण म्हात्रे, कृष्णा पाटील, दत्तात्रेय म्हात्रे, मिलिंद खार पाटील, प्रकाश ठाकूर, हसूराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नातेवाईक उपस्थित होते. शंकर माळी यांनी दि. 23 मे, 1990 साली जेएनपीएमध्ये सागरी अग्निशमन विभागात प्रवेश केला. सात वर्षानंतर त्यांची चेकर पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते मरीन डिपार्टमेंट व सेफ्टी सेक्शन मध्ये कार्यरत होते. 36 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी जेएनपीएच्या या विभागात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या.







