| अलिबाग । प्रतिनिधी ।
उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मंगलवारी सायंकाळी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अलिबागसह अनेक भागात ठीक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. या पावसामध्ये भिजण्याचा आनंद अलिबागकरांनी मन मनमुरादपणे लुटला.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. कडक उन्हामुळे घरातून बाहेर पडणे देखील कठीण झाले होते. पाऊस कधी पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मंगळवारी (दि.2) सायंकाळी अचानक रिमझिम पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हलक्या सरी अलिबागचा अनेक भागात कोसळू लागल्या. पंधरा मिनिटांसाठी आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या रिमझिम पावसाने मोठा दिलासा मिळाला. अनेकांनी घराबाहेर पडून पावसाचा आनंद घेतला, तर काहींनी सोशल मीडियावर पावसाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. अलिबाग तालुक्यातील नागरिकांनी या सुख सुखद गारव्याचा अनुभव घेतला. तालुक्यातील काही ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. गार वारा सुटल्याने नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास घेतला.






