। रसायनी । प्रतिनिधी ।
कष्टकरीनगर येथील हिरामण किसन काळे (55) हे खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेने खंडोबा मंदिरात जात असताना वाटेत त्यांना उष्माघातमुळे चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालय, चौक खालापूर येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई बाचकर अधिक तपास करीत आहेत.







