• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 5, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अधिकाऱ्यांना चिरनेरकरांनी हुसकावून लावले; तिसऱ्या मुंबईला कडाडून विरोध

| उरण | प्रतिनिधी |

तिसरी मुंबई प्रकल्पाविरोधात उरण, पनवेल, पेण, कर्जत आणि अलिबाग परिसरातील शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला असून, सरकार आणि एमएमआरडीएविरोधातील संघर्ष अधिकच तीव्र बनला आहे. एकीकडे हजारो शेतकरी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे येत्या रविवारी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या ऐतिहासिक शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे शुक्रवारी सकाळी चिरनेर गावात जमिनीच्या सर्व्हेसाठी सरकारी अधिकारी दाखल झाल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रोष अनावर झाला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवत तेथून हुसकावून लावले.

शेतकऱ्यांच्या मते, हा प्रकार म्हणजे आंदोलनाची धार बोथट करण्याचा आणि जनतेच्या भावना डिवचण्याचा सरकारचा आणखी एक प्रयत्न आहे. भूसंपादनाच्या विरोधात हजारो हरकती दाखल झालेल्या असताना, त्या हरकतींवर साधी सुनावणी घेण्याचे सौजन्यही शासनाने दाखविलेले नाही. मात्र दुसरीकडे सर्व्हे, मोजणी आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया सुरू ठेवून शेतकऱ्यांच्या माथी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तिसरी मुंबई प्रकल्पासाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 महसुली गावे तसेच कर्जत व अलिबागमधील वाढीव 74 महसुली गावे अशा एकूण 198 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे हजारो कुटुंबांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने संघर्ष करत आहेत.

भूसंपादनाविरोधात तब्बल 25 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी लेखी हरकती नोंदवल्या आहेत. मात्र, शासनाने या हरकतींची दखल घेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम सुरू ठेवल्याचा आरोप होत आहे. गावोगावी आयोजित बैठका, जनजागृती मोहिमा आणि आंदोलनांतून आता एकच संदेश दिला जात आहे. “जमीन देणार नाही, गाव उद्ध्वस्त होऊ देणार नाही!” शेतकऱ्यांचा आरोप आहे की, सरकारने अद्यापही या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा, पुनर्वसनाचे धोरण, गावांचे भवितव्य, स्थानिकांच्या घरांचे आणि व्यवसायांचे काय होणार याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.

विशेष म्हणजे, अनेक गावांमध्ये भूमीपुत्रांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवरच घरे, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने उभारली आहेत. शासनानेच गेल्या चार-पाच दशकांपासून गावठाण विस्ताराचा प्रश्न प्रलंबित ठेवला. परिणामी, आज हजारो घरे आणि आस्थापना शासनाच्या नजरेत अनधिकृत ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सर्वांना क्लस्टर डेव्हलपमेंटसारख्या स्थानिकांना मान्य नसलेल्या योजनांमध्ये जबरदस्तीने ढकलले जाणार का, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारा शेतकरी मेळावा हा आंदोलनाचा निर्णायक टप्पा मानला जात आहे. या मेळाव्यात माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील शेतकऱ्यांना कायदेशीर आणि घटनात्मक लढ्याची दिशा देणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चिरनेर गावात सर्व्हेसाठी अधिकारी दाखल झाल्याची माहिती मिळताच शेतकरी नेते संतोष ठाकूर, सुरेश पाटील, प्रफुल्ल खारपाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. “आमच्या जमिनींबाबत निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करण्याची हिंमत नाही आणि सर्व्हे करायला मात्र धाडस दाखवता? हा कोणता न्याय?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना केला.

“तिसरी मुंबईसाठी आम्ही जमीन देणार नाही. आमच्या संमतीशिवाय कोणताही सर्व्हे, मोजणी किंवा सरकारी प्रक्रिया आम्ही होऊ देणार नाही. सरकारने आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. वाढता विरोध आणि संतप्त वातावरण पाहता अधिकाऱ्यांना अखेर माघार घ्यावी लागली.
चिरनेरमधील ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून, संपूर्ण प्रकल्पग्रस्त पट्ट्यातील उफाळून आलेल्या असंतोषाचे प्रतीक मानली जात आहे. सरकार आणि एमएमआरडीएने अद्यापही शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर आगामी काळात आंदोलन अधिक उग्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Related

Tags: farmers protestindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

Next Post

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Alibag Municipal Council: अलिबाग स्थानकात ‌‘बॉटल बीन’
sliderhome

Alibag Municipal Council: अलिबाग स्थानकात ‌‘बॉटल बीन’

June 5, 2026
Environment Day: तळोजात पर्यावरण दिन साजरा
कार्यक्रम

Environment Day: तळोजात पर्यावरण दिन साजरा

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?