। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याला रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चांगलाच झोडपलं. मागील 24 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात सरासरी 105.975 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस हा दक्षिण भागातील म्हसळा ,श्रीवर्धन , तळा, माणगाव,पोलादपूर तालुक्यात झाला असून, म्हसळा मध्ये 169 मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, जिल्ह्यात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यात तालुक्यानुसार झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
अलिबाग -65
मुरूड -151
पेण -70
पनवेल -119.2
उरण -73
कर्जत - 89
माथेरान -107.4
खालापूर - 38
रोहा - 65
सुधागड - 111
माणगाव -132
तळा -162
महाड - 69
पोलादपूर - 108
श्रीवर्धन - 167
म्हसळा -169
एकूण :- 1695.6मिमी
सरासरी :- 105.975







