। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्वच्छता पंधरवडा अंतर्गत भारत सरकार महारत्न कंपनी गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने व गेल कंपनीचे अनुप गुप्ता, जितिन सक्सेना यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषद शाळा, खानाव या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या वतीने पथनाट्यातून स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यात आली.
या पथनाट्यात कलाकारांनी ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा ठेवा, प्लास्टिकचा वापर टाळा, प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला तर निश्चितच आपला देश देखील स्वच्छ होईल, असा संदेश देण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास गेल इंडिया लिमिटेडचे संदीप पासवान, सुजन ठाकूर, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा नंदकुमार गोंधळी, रायगड जिल्हा परिषद शाळा खानाव चे मुख्याध्यापक रवींद्र थळे, संतोष पालकर, सचिन कांबळे, मनीषा बलकवडे, रश्मी काटले यांसह गेल इंडिया लिमिटेड उसरचे कर्मचारी, तसेच प्रिझम संस्थेचे कलाकार सूचित जावरे, प्रणाली तळेगावकर, राज म्हात्रे, सेजल काठे, कशिश पाटील, अनुष्का रणपिसे यांसह शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.







