गुरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम
|कोलाड |प्रतिनिधी |
मानवाचा हलगर्जीपणामुळे तसेच पर्यावरणाबाबत असलेल्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन प्रचंड प्रमाणात बिघडत चालले असल्याने ते प्राणी मात्रारांच्या जीवावर उठत असल्याचे पाहाव्यास मिळत आहे. प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असून देखील त्याचा बेसुमार वापर आपणाकडून केला जात आहे. बाजारात जातांना कापडी किंवा कागदी पिशवी नेण्यास आपणास कमी पणा वाटतोय तर बाजारातील दुकानदारांकडून पुरविल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांचा काम झाल्यावर ते कुठेही फेकून दिल्या जात आहेत. यामुळे आपल्या सभोवताली प्लॅस्टिक पिशव्यांचे साम्राज्य वाढत असल्याचे दिसून येत आहे.
उकिरडे तर प्लॅस्टिक पिशव्याने भरलेले आहेत.त्या उकिरड्यावर गुरे-ढोरे चरावयास येतात त्यावेळी उकिरड्यातील खाद्य पदार्थांबरोबर प्लॅस्टिकचे ही भक्षण त्यांच्याकडून केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
वाढते शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येचा बेजबाबदारपणा प्रवृत्तीचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. तर शेतीला पूरक असणाऱ्या पशु धनावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे. आपल्या निष्काळजी पणामुळे पर्यावरणातील ठिकठिकाणी घाणीच्या साम्राज्यावरील प्लॅस्टिक गुरा-ढोरांच्या जिवावर उठत आहे. उकिरड्यावरील प्लॅस्टिक पोटात गेल्याने गुरे ढोरे व इतर प्राणी मात्राला मात्र भयंकर त्रास सहन करावा लागत असुन प्लॅस्टिक पिशव्या पोटात गेल्याने पचन क्रियेसह रवंथ क्रियेवर देखील परिणाम होत आहे. तर प्लॅस्टिक पोटात गेल्याने गुरे ढोरे दगावली जात असल्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे.







