| पनवेल | प्रतिनिधी ।
शरीरसंबंध होत असताना व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करून 75 लाखांची खंडणी स्वीकारल्या प्रकरणी चौघां विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार 65 वर्षीय असून खारघर येथे राहत आहेत. 2019 मध्ये ते मुंबई येथे राहत असताना शफिक शेख, मुस्कान शेख, राजेंद्र उत्तेकर आणि मिनू मुमताज यांनी कट रचून त्यांचा शरीरसंबंध होत असलेला व्हिडिओ तयार केला. आणि त्यांना ब्लॅकमेल केले व त्यांची कंपनी हडप करण्याच्या उद्देशाने अश्लील व्हिडिओ सर्वांना दाखवण्याची भीती दाखवली. आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून 75 लाख रुपये खंडणी मागून मीनू, मुस्कान शेख आणि शफिक शेख यांनी ती स्वीकारली. या प्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.







