प्रभाग क्रमांक ७ मधील अपक्ष शिवसेना पुरस्कृत उमेदवार बिनविरोध.
तळा प्रतिनिधी
तळा नगरपंचायत निवडणुकीत १३ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून १७ जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. या १७ जागांपैकी ओबीसी च्या ४ जागा स्थगित कारण्यात आल्या असून १ जागेवर बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक रिंगणात ३६ उमेदवार उभे आहेत. प्रभाग क्रमांक ७ मधे एकाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.आता खऱ्या अर्थाने १३ ठिकाणी लढती होणार होत्या मात्र एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराचा एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने त्या ठिकाणी लढत न होता बिनविरोध झाल्याने १२ प्रभागात शिवसेना, राष्ट्रवादी,भाजपा , शेकाप, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी,व अपक्ष उमेदवारांमधे चुरसीच्या लढती होणार आहेत.चौरंगी ४ ठिकाणी,तिरंगी ५ ठिकाणी तर दुरंगी ४ ठिकाणी अशा चुरसीच्या लढती पहायला मिळणार आहेत. आज लागणारा ओबीसी आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने उद्यावर ढकलला असल्याने निवडणुकीबाबत उमेदवारांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.