अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग दिनाचे औचित्य साधुन भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व भंडारी वाघीण स्त्रीशक्ती समिती यांच्यातर्फे २१ जुन ते २६ जुन या दिवसात मोफत योगा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम Zoom एप्लिकेशन वर ऑनलाईन होणार आहे. फ्री रजिस्ट्रेशन साठी योगा १२३ असा मेसेज पुढील दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर नावासहीत पाठवावा. ८६२६०८४३४३. विषेशत: १४ पासून पुढील वयोगटातील महीलांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब किंवा अन्य शारीरिक व्याधि अथवा सर्जरी झाली असल्यास नोंदणी करू नये, ही विनंती.