। खांब-रोहे । वार्ताहर ।
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे श्रमिक विद्यालय चिल्हे येथे राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ व स्वा.विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक दिपक जगताप व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी माँसाहेब जिजाऊ व स्वा.विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थी वर्गानेही आपापले मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. यावेळी येथील शिक्षक नरेंद्र माळी, संजय आंधळे, शिवनाथ दराडे, सुनील थिटे, महेंद्र जवरत, राजेश म्हात्रे, अमोगसिद्ध सुरवसे, पांडुरंग शिद, अमित डाके, प्रविण मरवडे, अनुराधा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.